आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांना हवेत 56 हजार अधिकारी - कर्मचारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना विविध पदांसाठी 56,022 कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत असून बँका सध्या या पदांची भरती विविध टप्प्यांत करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. जवळपास 25 सार्वजनिक बँकांमधील विविध रिक्त पदांमध्ये अधिकारी वर्गासाठी मार्चपासून 23,794 पदे रिक्त आहेत. चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँका 50 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्याचा अंदाज आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात 63 हजार नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या एकट्या बँकेने 20 हजार लिपिक कर्मचारी, 1,200 अधिकारी पातळीवरील कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या. अन्य सार्वजनिक बँकांनी 22 हजार अधिकारी आणि 20 हजार लिपिक कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या.

राष्ट्रीयीकृत बँकांमधील मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने बँकिंग कामकाजाचे नियोजन करण्यासाठी 19 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण 442 महाव्यवस्थापकांची संख्या असणे गरजेचे असल्याचे अलीकडेच वित्त मंत्रालयाने म्हटले होते.

यंदा राष्ट्रीयीकृत बँका आणखी 10 हजार शाखांची भर घालण्याची अपेक्षा असून त्यामध्ये दोन हजार शाखा ग्रामीण विभागीय बँकांकडून निर्माण केल्या जातील. त्याचप्रमाणे या शाखांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. सर्व बँका मिळून चालू आर्थिक वर्षात 50 हजार लोकांच्या नियुक्त्या करतील, असे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी जूनमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले होते. या पैकी बर्‍याच पदांसाठी बँकांतर्फे भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


रिक्त पदांची स्थिती
पद : अधिकारी
बँक ऑफ बडोदा 1,500
सिंडिकेट बँक 1,500
बँक ऑफ इंडिया 1,473
अलाहाबाद बँक 1,450
पंजाब अँड सिंध बँक 1,454
पंजाब नॅशनल बँक 1,119
उप- कर्मचारी पातळीवरील एकूण रिक्त जागा : 9,881
पद : लिपिक
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांसह अन्य विविध बँकांमधील लिपिक पदाच्या जागा रिक्त आहेत. त्या अशा.
एकूण रिक्त जागा 22,347
बँक ऑफ बडोदा 3,615
अलाहाबाद बँक 2,627
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर 2,500
पंजाब नॅशनल बँक 2,200
बँक आफ इंडिया 1,468