आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडी बाजारातही करता येणार बँकेचे व्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुर्गम अशा ग्रामीण भागात राहणा-या प्रचंड लोकसंख्येपर्यंत कमी खर्चात सुरक्षित व पारदर्शक आर्थिक सेवा पोहोचवणे हे आज सर्वच बँकांसमोर मोठे आव्हान आहे. आजही लोकसंख्येपैकी 40 टक्के लोकसंख्या बॅँक व्यवहार करण्यापासून वंचित आहे. हे लक्षात घेऊन ‘फिनो पेटेक’ कंपनीने ग्रामीण भागातील बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी नवीन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
देशातल्या प्रत्येक सज्ञान नागरिकाचे बँकेमध्ये खाते असलेच पाहिजे, अशी शिफारस डॉ. नचिकेत मोर समितीने देशातील सर्व बँकांना केली आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकिंग यंत्रणा पोहोचवण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रतिनिधी यांचाही योग्य वापर करून जानेवारी 2016 पर्यंत भारतातील सर्वच नागरिकांना बँकेची सुविधा पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवले आहे.
‘फिनो’तर्फे देण्यात येणा-या किऑक्स बँकिंग आणि एईपीएस मायक्रो एटीएमसारख्या यंत्रणा या बँकांच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या प्रयत्नांना चालना देणा-या आहेत. बँकेच्या कामाशी संलग्न असलेल्यांशी सहकार्याने काम करून ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे शक्य होणार आहे. यामुळे बॅँकांच्या होण्याबरोबरच त्यांच्या क्षमतेत वाढ होऊन बॅँकांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. भविष्यात फिनोतर्फे ईकेवायसी आणि इतर वित्तीय संस्थांना अर्थसाहाय्य या सेवाही पुरवण्यात येणार आहेत.
अशी आहे सेवा
> ग्रामीण भागात आठवड्याच्या बाजार वा तालुक्याच्या मुख्य ठिकाणी येऊन बायोमेट्रिक तंत्रज्ञान व लॅपटॉपचा वापर करून ग्राहकांची नोंदणी व बँकांचे व्यवहार करणे शक्य.
> आधार कार्डवर आधारित व्यवहार करण्यासाठी मायक्रो एटीएम प्रणाली
> हातात वापरण्यात येण्यासारखे एक यंत्र असून यामध्ये यूआयडी, मोबाइल आणि ब्रॉडबँड जोडणीसारख्या तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर.
> बँकांच्या मुख्य बँकिंग यंत्रणेशी केंद्रीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण व यूआयडीवर आधारित व्यवहार संलग्न करण्यासाठी फायनान्शियल इन्क्ल्युजन गेटवे आधुनिक प्रणाली.