आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटरीवरील कारचे युग अवतरेल का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या डेट्राईटमधील ऑटोमोटिव्ह न्यूज वर्ल्ड संमेलनात जनरल मोटर्स कंपनीचे उत्तर अमेरिका विभागाचे अध्यक्ष मार्क रयूज यांनी घोषणा केली की, इलेक्ट्रिक कारचा काळ अजून संपलेला नाही. त्यांचे म्हणणे खरे आहे. कार उत्पादक कंपन्या आता बॅटरीवर चालणा-या जास्त कार बाजारात सादर करत आहेत. फियाट, कॅडिलॅक, फोर्ड व होंडा या वर्षात नवीन इलेक्ट्रिक मॉडेल सादर करत आहेत.

बॅटरीवर चालणा-या दोन कारचा बाजार वाढला आहे. 2012 मध्ये जीएमची चॅव्ही व्होल्टची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट वाढली आहे. निसानच्या लीफ कारची विक्री दीड टक्क्याने वाढली आहे. विक्री वाढली असली तरी लीफ आणि वोल्ट आपले उद्दिष्ट गाठण्यात मागे आहेत. अमेरिकेत इलेक्ट्रिक कारची ऑटोबाजारात किरकोळ भागीदारी आहे. 2012 मध्ये कारच्या विक्रीत इलेक्ट्रिक कारची भागीदारी 3.5 पेक्षा कमी होती. इलेक्ट्रिक कारसाठी सर्वात मोठा अडथळा त्यांची रेंज आहे. लीफसारख्या कार 80 मैल चालल्यानंतर रिचार्ज करावी लागते. रिचार्जिंगमध्ये बराच वेळ लागतो. एडमंड डॉट कॉममधील ग्रीन कार विश्लेषक जॉन ओ डेल यांच्या मते, अधिकांश लोकांसाठी इलेक्ट्रिक कार दुस-या गाडीची जागा घेऊ शकते.

इलेक्ट्रिक कारच्या किमतीही एक मुख्य मुद्दा आहे. 39,145 डॉलरच्या व्होल्ट कारची किंमत पेट्रोलवर चालणा-या तशाच कारपेक्षा दुप्पट आहे. 10 हजार डॉलरची कर सवलत मिळूनही फारसा फायदा होत नाही. लीफ आणि व्होल्ट कारचा मासिक हप्ता कमी केल्याने विक्रीत फरक पडला आहे. निसानने लीफची किंमत 6400 डॉलर कमी केली आहे. जनरल मोटर्सच्या अधिका-यांच्या मते, व्होल्टची आगामी कार मागील वर्षाच्या तुलनेत एक हजार डॉलरने स्वस्त असेल. बॅटरीवर चालणा-या कारसाठी नवीन मॉडेल पहिल्यापेक्षाही सरस आहे. त्यांचा आवाका वाढवण्यात आला आहे. बॅटरी चार्जिंगचा कालावधी कमी झाला आहे. या वर्षभरात कळेल की, भविष्यातील कार म्हणवल्या जाणा-या या गाड्यांचे भविष्य काय असेल?

भविष्यातील कार
कॅडिलॅक इएलआर 60200 डॉलर

गॅस आणि बॅटरीच्या शक्तीवर वेगाने धावणा-या या कारची चाके 20 इंचांची आहेत. चामड्याचे सुंदर सीट आणि एलईडी लायटिंग हिचे वैशिष्ट्य आहे. बॅटरीवर 35 मैल चालल्यानंतर इंजिन गॅसवर चालते.

होंडा अ‍ॅकॉर्ड प्लग इन
किंमत - 37980 डॉलर
होंडाची नवीन सीडान बॅटरीवर 13 मैल धावल्यानंतर गॅसचा वापर करते. हिची रेंज 574 मैल आहे. या वर्षात हिची विक्री सुरू होईल.

फियाट 500 ई
किंमत - 30000 डॉलर
हे फिएटचे नवीन आणि छोटे मॉडेल आहे. पूर्णपणे बॅटरीवर चालणा-या कारमध्ये याची रेंज 87 किलोमीटर इतकी सर्वाधिक आहे.

निसान लीफ-
किंमत 28800 डॉलर
निसानला अपेक्षा आहे की, लीफची किंमत 6400 डॉलर कमी केल्याने विक्री वाढेल. काही इतर सवलती दिल्यावर किंमत 19000 डॉलरने कमी होईल.