आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 TIPS वाढवू शकतात तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचे बॅटरी बॅकअप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Demo Pic)

गॅजेट डेस्क
- स्मार्टफोन आल्याने एकीकडे अनेक नवनवीन फीचर्स आले आहेत, तर दुसरीकडे मोबाईलची बॅटरी लवकर संपण्याच्या समस्याही सुरू झाल्या आहेत. आवश्यक कॉल करताना जर मोबाईलची बॅटरी संपली तर खुपच चिडचिड होते, मात्र काही ट्रीक वापरल्या अथवा सावधानता बाळली तर तुम्ही तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपची बॅटरीलाईफ वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, बॅटरीलाईफ वाढवण्याच्या काही खास टीप्स...

तापमानावर लक्ष द्या...
तुमच्या डिव्हाईसच्या बॅटरीवर त्याच्या जवळपासच्या तापमानाचा प्रभाव पडतो. तर तुम्ही 0 डिग्री सेल्सियसच्या खाली अथवा 35 डिग्री सेल्सियसच्या वर तापमान असलेल्या ठिकाणी असाल तर तुमची बॅटरी खुपच लवकर संपेल. याशिवाय, खुप गर्मी असेल तर त्याचाही प्रभाव बॅटरीवर पडतो. यामुळे डिव्हाईस गरम होतो आणि बॅटरीची क्षमताही कमी होते. यामुळे तुमचा फोन, टॅबलेट सूर्याच्या गर्मीपासून दूर ठेवावा. थंडीच्या तुलनेत गर्मी बॅटरीवर जास्त प्रभाव पाडते.त्याचबरोबर लॅपटॉपवरही असेच परिणाम पाहायला मिळतात. लॅपटॉपचा जेवढा वापर केला जातो तेवढी बॅटरी गरम होते. यामुळे लॅपटॉपला थंड ठेवण्यासाठी काही ना काही उपाय करायलाच हवे. लॅपटॉप कधीच तुमच्या शरीराच्या संपर्कात ठेवू नका. याशिवाय लॅपटॉप एखाद्या पुस्तकावर अथवा कुलींगपॅडवर ठेवावा.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर 5 TIPS