आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमिंगसाठी मोबाईल कंपन्यांमध्‍ये युद्ध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टेलिकॉम क्षेत्रात आणखी एका दरयुद्धाला सुरुवात झाली आहे. या वेळी हे युद्ध आहे मोफत रोमिंगचे. युद्धाच्या मैदानात आघाडीवर आहे एअरटेल लिमिटेड. एअरसेलने मोफत रोमिंगची सुरुवात केली आहे. कंपनीने देशभरात कॉलिंग, डाटा आणि एसएमएसचे दर एकसमान केले आहेत. तसेच रोमिंग शुल्कही हटवले आहे. यामुळे एअरसेलच्या ग्राहकांना देशभरातील कोणत्याही सर्कलमध्ये रोमिंग शुल्क न देता आपल्या प्लॅनच्या कॉल दरानुसार बोलता येणार आहे. रोमिंग माफ केल्याने इतर सर्कलमधील ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठीचे शुल्कही माफ झाले आहे. मात्र, यासाठी ग्राहकांना मासिक शुल्क अदा करावे लागणार आहे.

दिल्लीत हे शुल्क 39 रुपये, तर मुंबईसाठी 32 रुपये प्रतिमहिना राहील.
एअरसेल लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑ‍ फिसर अनुपम वासुदेव यांनी सांगितले, बाजारपेठेत सर्वेक्षण केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या टेरिफ प्लॅनमुळे ग्राहक संभ्रमावस्थेत असल्याचे आम्हाला आढळून आले. हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही हा नवा प्लॅन सादर केला. रोमिंगद्वारे मिळणाºया उत्पन्नावर प्रारंभीच्या काळात याचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, यामुळे अधिकाधिक ग्राहक आमच्या नेटवर्कमध्ये येतील. त्याच्याकडून होणारा वापर वाढेल. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या उत्पन्नात भर पडेल.

विशेष म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना एकूण उत्पन्नाच्या 8 ते 10 टक्के उत्पन्न रोमिंगद्वारे मिळते. एअरसेलने आपली नवी मोफत रोमिंगची योजना ‘वन नेशन वन रेट’ या नावाने बाजारात आणली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून ही नवी योजना देशभरात लागू झाली आहे. कंपनीचे राष्ट्रीय स्तरावर साडेसहा कोटी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या आधारे कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा चार टक्के, तर महसुलाच्या आधारे हे प्रमाण तीन टक्के आहे.