आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अ‍ॅन्ड्राइडवर येणार BBM Voice आणि Channels

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
BBM अ‍ॅप लोकप्रिय आहे. BusinessLine च्या मते आता BLACK BERRY, BBM VOICE आणि BBM चॅनल्स हे अ‍ॅप ios आणि अ‍ॅन्ड्राइड प्लॅटफॉवर लॉन्च करणार आहे. हे कधीपर्यंत लॉन्च होईल याची अधीकृत माहिती कंपनीकडून अद्याप मिळालेली नाही.
गेल्या वर्षीच BLACK BERRYने BBM हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्राइड आणि IOS च्या धरतीवर लॉन्च केले होते. पहिल्याच दिवशी 10 मिलीयन लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केल्याचा दावा कंपनीने केला होता. 2013 च्या शेवटी हा आकडा वाढून 40 मिलीयन पर्यंत पोहचला.
BBM Voice आणि BBM Channels हे BLACK BERRYचे प्रसिद्ध अ‍ॅप्स आहेत. कुठल्याही ठिकाणा वरून कोणालाही मॅसेज आणि कॉल करण्याची सुविधा BBM Voice मध्ये उपलब्ध आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये वाय-फाय आणि BBM Voice असणे गरजेचे आहे. BBM Channels हे BLACK BERRYचे एक खास फिचर आहे ज्यात तुम्हाला BBM देखील मिळते. याच्या मदतीने लाखो BBM युजर्स एकाचवेळी कनेक्ट होतात. एखाद्या सोशल साइटप्रमाणे हे अ‍ॅप काम करते.