आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांकडून नियमांचे काटेकोर पालन हवे; RBI च्या संचालिका दीपाली जोशी यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बँकिंग कोड्सचे (नियमावली) उल्लंघन आणि अंमलबजावणीत असलेल्या त्रुटींवर ‘बीसीएसबीआय’ या संस्थेचे लक्ष असते. त्यामुळे कोड अंमलबजावणीच्या बाबतीत अनेक बँकांनी कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालिका डॉ. दीपाली पंत-जोशी यांनी व्यक्त केले.

नियमावलीचे पालन, मूल्यनिर्धारणांचे प्रमाणीकरण याकडे लक्ष ठेवणार्‍या आणि त्यांचे मूल्यनिर्धारण करणार्‍या ‘द बँकिंग कोड्स आणि स्टँडडर्स बोडर््स आॅफ इंडिया’ (बीसीएसबीआय) या स्वायत्त आणि स्वतंत्र संस्थेची वार्षिक परिषद नुकतीच मुंबईत झाली त्या वेळी त्या बोलत होत्या.‘बीसीएसबीआय’ संस्थेने 2012-13 आर्थिक वर्षात सदस्य बँकांपैकी 10 टक्के बँकांना चांगली श्रेणी दिली असून 52 टक्के बँकांना सरासरीच्या वरची श्रेणी, तर 38 टक्के बँकांना सरासरी किंवा सरासरीच्या खालची श्रेणी दिली आहे. या बाबीकडे पीसीसीओंचे लक्ष वेधण्यात आले, जेणेकरून बॅँकिंग कोडच्या बाबतीत ग्राहकांशी असलेली बांधिलकी या बँकांना पूर्ण करता येईल यादृष्टीने ही श्रेणी देण्यात आल्याकडेही डॉ. पंत-जोशी यांनी लक्ष वेधले. कोड्सची अंमलबजावणी करताना ज्या त्रुटी जाणवल्या होत्या, त्या लक्षात आणून देणे हा या परिषदेचा हेतू असल्याचे बीसीएसबीआयचे अध्यक्ष ए. सी. महाजन यांनी या वेळी सांगितले.

बीसीएसबीआयच्या 127 सदस्य बँका आहेत. मालमत्तेच्या आधारावर व्यवसाय करणार्‍या बँकांमधील 98 टक्के बँकांचा यात समावेश आहे. प्रत्येक सदस्य बँकेत पीसीसीओच्या रूपाने एक दर्शकबिंदू किंवा दुवा आहे. कोडची अंमलबजावणी आणि ग्राहकसेवा यासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही वार्षिक परिषद घेण्यात येते.