आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या रकमांच्या चेकबाबत सतर्कता बाळगा - रिझर्व्ह बँक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोठ्या रकमांचे धनादेश वटवण्यापूर्वी खातेदाराला त्याबाबत सूचना देण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. समजा वटणावळ मूळ शाखेत (ज्या शाखेत खाते आहे) होत नसेल तर त्या शाखेलाही त्यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चेक पाच लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचा असेल तर त्याची अनेक पातळ्यांवर पडताळणी गरजेची असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.यात खातेदाराची गोपनीय माहिती कोठेही उघड होणार नाही याची काळजी बँकांनी घ्यावी. धनादेश वटणावळीत होत असलेल्या फसवणुकी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.