आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Aware At The Time Of Swipe Your Card, Personal Data Can Be Steal

कार्ड स्वॅप करताय, सावधान!!! तुमचा पर्सनल डाटा होऊ शकतो चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ऑनलाइन ट्रानझॅक्शन्समध्ये आता हॅकर्सनी प्रवेश केला असून, खरेदीच्या वेळी क्रेडीट किंवा डेबीट कार्ड स्वॅप करणा-या ग्राहकांना सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनी दक्षतेचा इशारा दिला आहे. शॉपिंग केल्यानंतर प्रत्येक वेळी तुमचा पिन कोड टाकणे रिझर्व बॅंकेने बंधनकारक केले आहे. हा निर्णय याचाच एक भाग होता.

आता डेक्सर, ब्लॉक पीओएस यासारख्या मालवेअरचा धोका वाढला असून हे हॅकर्स तुमचा पर्सनल डाटा जसे, की आकाउंट धारकाचे नाव, आकाउंट नंबर, कार्ड व्हेरिकेशन नंबर, कार्डची अंतिम मुदत अशी माहिती हॅक करतात.

ट्रोजन नावाचे हे मालवेअर खुपच सेंसिटिव्ह आहे. हे एकदा स्विप मशीनमध्ये दाखल झाले, की मशीनमधील सर्वच डाटा हॅक करते. ऑनलाइन कॅश ट्रान्सफर आणि कार्ड स्विप करणा-यांना या मालवेअरने आपले मुख्य लक्ष्य केले आहे.

कार्ड स्वॅप करताना ग्राहकांनी जागरूक राहावे. याच बरोबर पीओएस धारकांनी त्यांच्या मशीनमध्ये मालवेअर प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी.

सायबर हल्ले रोखणाऱ्या विभागाने यासाठी काही सुचना दिल्या आहेत. पीओएस सॉफ्टवेअर असणारे कॅम्प्युटर नेहमी अपडेट ठेवावे. पीओएस अ‍ॅक्टीव्ह असणा-या कॅम्प्युटरवर इतर अ‍ॅक्टीव्हीटीज करू नयेत.

असे मालवेअरस हे ई-मेलच्या माध्यमातून पाठवले जात असल्याने अनोळखी व्यक्तिकडून आलेले मेल ओपन करू नका. याचबरोबर पीओएसधारकांनी नेहमी आपल्या कॉम्प्युटरमध्ये अ‍ॅंटीमालवेअर वापरण्याच्या सुचना विभागाने दिल्या आहेत.