आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक नसल्याने बीडमध्ये व्यवहार थंडावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याप्रमाणेच या वेळीही अन्नधान्याची आवक कमी राहिल्याने व्यवहारही थंडावले होते. गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीमुळे सुटी असल्याने ग्राहकी कमीच होती. आठवडाभरात येथील मोंढ्यात केवळ 1533 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली.


दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून धान्याची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. या आठवड्यात ज्वारीची 830 क्विंटल आवक झाली. किमान 1520 रुपये ते कमाल 2221 रुपये क्विंटलप्रमाणे व्यवहार झाले. सरासरी 1620 रुपये क्विंटल भाव ज्वारीला मिळाला. बाजरीचे दरही स्थिर होते. 631 क्विंटल बाजरीची आवक झाली. 1385 ते 1565 रुपये क्विंटलप्रमाणे भाव राहिले. गव्हाचे भाव 1700 ते 2366 रुपये होते. विशेष म्हणजे तालुक्यातून केवळ 30 क्विंटल गव्हाची आवक होती. त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरातच्या गव्हाला मागणी राहिली. हरभ-याची आवकही नगण्य होती. आठवड्यात 42 क्विंटल आवक झाली. 3265 ते 3480 रुपये क्विंटलप्रमाणे व्यवहार झाले. सरासरी 3380 रुपये भाव राहिला.

व्यापार समाधानकारक
* बाजारात जेमतेम आवक राहिली. त्यामुळे तेजी-मंदी नव्हती. आगामी काळात आवक घटू शकते. स्थानिक ग्राहकांकडूनच मागणी होती. मोठे व्यवहार झाले नाहीत. व्यापार समाधानकारक राहिला. :
किसनराव नाईकवाडे, आडत व्यापारी, बीड.
* दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या आवक कमी आहे. उन्हाळी बाजरीची आवक पुढील आठवड्यापासून वाढेल. तालुक्यातील शेतक-यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल आणावा.:
अ‍ॅड. संग्राम तुपे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड.