आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Take Information, Then Invest Money; Reserve Bank Give Advise

आधी माहिती घ्या, मग पैसे गुंतवा; रिझर्व्ह बँकेचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फसव्या योजनांची अनेक प्रकरणे उघडकीस येत असताना आधी कंपनी, बँकांची माहिती घ्या मग त्यात गुंतवणूक कार असा सल्ला रिझर्व्ह बँकेने गुंतवणूकदारांना दिला आहे. बँकेतर वित्तीय कंपन्यात (एनबीएफसी) व इतर कंपन्यांत पैसे गुंतवण्यापूर्वी ही काळजी अधिक घ्यावी असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.


पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळ्यात हजारो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने ही दक्षता घेण्याचे सुचवले आहे. कोणत्याही वित्तीय फर्मकडून अवैधरित्या पैसे जमा करणे तसेच गुंतवणुकीची परतफेड न करणे या सारख्या घटनांत लगेच तक्रार करावी, कोणत्याही बँकेतर वित्तीय पूरवठा कंपनीत (एनबीएफसी) पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्या कंपनीची वेबसाइट पाहावी. त्यावरुन त्या कंपनी नोंदणीकृत आहे की नाही याची पडताळणी करावी. प्रचलित व्याजदरांपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमीष कोणी दाखवत असेल तर निश्चित संशय घ्यावा. सध्या तरी कोणतीही एनबीएफसी 12.5 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देण्याचे आमीष दाखवू शकत नाही.