कार खरेदी करण्‍यापूर्वी / कार खरेदी करण्‍यापूर्वी या गोष्‍टीं जाणून घ्‍या........

दिव्य मराठी वेब टीम

Apr 29,2013 05:55:00 PM IST

कार असणे ही बहुतेकांच्या जीवनातील महत्त्वाची गरज बनली आहे. असे असले तरीही गाडी खरेदी करणे काही सोपे नाही. त्यासाठी अनेक मार्केट रिसर्च करणे आवश्‍यक आहे. आजघडीला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कोणती गाडी खरेदी करावी किंवा नाही हे अवघड आहे. कार खरेदी करताना जहिरात, कुटूंबसदस्य, किंमत, वैशिष्‍ट्ये, वित्तपुरवठा, हप्त्यांची सुविधा या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. पण या व्यतिरिक्त काही गोष्‍टी महत्त्वाच्या आहेत.


divyamarathi.com वर जाणून घ्‍या कार खरेदी करताना कोणत्या गोष्‍टींची काळजी घ्‍यावी..........

कार खरेदी करताना विशिष्ट ब्रँड डिलरला सांगितल्यास तो त्याचा ब्रँडविषयी माहिती देतो. त्यामुळे कोणताही विशिष्ट ब्रँडचा हट्टास करण्याऐवजी बाजारात उपलब्ध गाड्यांची माहिती घेऊन गेल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.विशिष्ट फीचर्स असलेली कार हवी असल्यास तसे डिलर्सशी बोलला. तो ती उपलब्ध करून देईल. त्यासाठी थोडे थांबावे लागले.गाडी निवडल्यानंतर त्याची चाचणी घेतली पाहिजे.त्यामुळे कारचा एकूण आवाका समजेल.आज बाजारात अनेक बँका कार लोन देत आहेत. यातून सर्वात स्वस्त व्याज असलेल्या बँकेची निवड करून कर्ज घ्यावे .नवीन कार खरेदी करणे शक्य नसेल, तर आपण सेकंड हँड कार खरेदी करू शकता.दुस-यांच्या मतांचा विचार करून कारची खरेदी करू नये. कारण तिचा संपूर्ण खर्च खरेदीदारालाच करावा लागतो.गरजेनुरूप गाडी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. कार खरेदीपूर्वी रक्कमेबाबत न बोलता, प्रथम तिची निवड करावी व नंतर रक्कम कोणत्यामाध्यमातून दिले जाणार आहे त्याविषयी बोला.गाडी खरेदी करताना रिसेल व्हॅल्यूकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

कार खरेदी करताना विशिष्ट ब्रँड डिलरला सांगितल्यास तो त्याचा ब्रँडविषयी माहिती देतो. त्यामुळे कोणताही विशिष्ट ब्रँडचा हट्टास करण्याऐवजी बाजारात उपलब्ध गाड्यांची माहिती घेऊन गेल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

विशिष्ट फीचर्स असलेली कार हवी असल्यास तसे डिलर्सशी बोलला. तो ती उपलब्ध करून देईल. त्यासाठी थोडे थांबावे लागले.

गाडी निवडल्यानंतर त्याची चाचणी घेतली पाहिजे.त्यामुळे कारचा एकूण आवाका समजेल.

आज बाजारात अनेक बँका कार लोन देत आहेत. यातून सर्वात स्वस्त व्याज असलेल्या बँकेची निवड करून कर्ज घ्यावे .

नवीन कार खरेदी करणे शक्य नसेल, तर आपण सेकंड हँड कार खरेदी करू शकता.

दुस-यांच्या मतांचा विचार करून कारची खरेदी करू नये. कारण तिचा संपूर्ण खर्च खरेदीदारालाच करावा लागतो.

गरजेनुरूप गाडी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. कार खरेदीपूर्वी रक्कमेबाबत न बोलता, प्रथम तिची निवड करावी व नंतर रक्कम कोणत्यामाध्यमातून दिले जाणार आहे त्याविषयी बोला.

गाडी खरेदी करताना रिसेल व्हॅल्यूकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.
X
COMMENT