आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणुकीचे काही निर्णय भावनिक होऊन घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुपमाने गृहकर्ज घेतले आहे. तिला दर महिन्यात पगारातून हफ्ता भरावा लागतो. त्यामुळे तिच्याकडे खर्चासाठी पैसेच उरत नाहीत. ती जेव्हा नोकरी बदलण्याचा विचार करते किंवा सध्याच्या नोकरीतील धोक्यांविषयी ऐकते तेव्हा ईएमआय देण्याची चिंता सतावते. नोकरीशिवाय ईएमआय भरणे तिच्यासाठी केवळ अशक्य बाब आहे. अनुपमाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी आपली सर्व मालमत्ता मुलीच्या नावावर केली आहे.


अनुपमाने विचार केला की, ही मालमत्ता विकल्यावर पैसे मिळतील. या पैशांतून ती गृहकर्जाची सर्व रक्कम एकदाच फेडू शकेल. त्यामुळे तिच्या डोक्यावर कर्जाचा बोजा राहणार नाही, पण तिचे मित्र म्हणतात की, गृहकर्ज फेडण्याऐवजी मालमत्ता विकून आलेले पैसे इतर गुंतवणुकाच्या योजनांमध्ये गुंतवले पाहिजे. नेमके काय करायला हवे, याचा निर्णय अनुपमाला घेता येत नाही.


आपणास घराकडे दोनप्रकारे पाहता येते. पहिले- स्वत:च्या घरातून सेन्स ऑफ सेक्युरिटी म्हणजे सुरक्षिततेची भावना अनुभवायला मिळते. स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोकांसाठी ती एक गुंतवणूक असते, तर काही लोकांचे कर्ज फेडताना घराशी भावनिक नाते आपसूकच जुळून जाते. ते केवळ पैशांकडे लक्ष देत नाहीत तर त्या घराशी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या त्यांचे ऋणानुबंध जुळतात.


अशा परिस्थितीत दोन गोष्टी समोर येतात- मनी मॅनेजमेंट (कोल्ड मनी डिसीजन) आणि इमोशनल अटॅचमेंट. एक-एक करून त्या गोष्टी समजून घेऊ. कोल्ड मनी डिसीजनमध्ये अनुपमाने मालमत्ता विकून येणा-या पैशांनी गृहकर्ज न फेडता ते पैसे इतर ठिकाणी गुंतवायला पाहिजेत. असे केल्याने तिला नोकरीत धोका असताना ईएमआयची चिंता जेव्हा सतावेल, तेव्हा ती इतर पर्यायांद्वारे नगदी पैसा घेऊ शकते. त्या वेळेपर्यंत पैसे वाढत राहतील. अनुपमा गरजेनुसार नगदी पैसा घेऊ शकते.


भावनिकदृष्टीने विचार केल्यास अनुपमासाठी घर म्हणजे केवळ गुंतवणूक नाही. ती घरात राहते. गृहकर्ज एकदाच फेडल्यास तिची घर गमावण्याची भीती निघून जाईल. त्यामुळे ती जो पैसा ईएमआयमध्ये देत होती, त्यांची बचत होत राहील. अनुपमाला वाटले तर ती सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करू शकते. त्याद्वारेही बचत केली जाऊ शकते. लोन द्यावे लागणार नाही त्यामुळे दर काही दिवसांनी गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज उरणार नाही.


गुंतवणुकीच्या बाबतीत नेहमी कोल्ड मनी डिसीजन घेऊ नका. काही निर्णय भावनिक होऊन घ्या. तुम्हाला स्वत:च्या घरात, ज्यावर काहीही कर्ज नाही, तेथे शांततेने राहण्यात आनंद मिळेल. मग तो योग्य आर्थिक निर्णय असो किंवा नसो.