आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: डिझायनर्ससाठी अत्‍यंत उपयुक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.whitezine.com: व्‍हाईटझाईन एक वेब मॅगझीन आहे. फोटोग्राफी, ग्राफिक्‍स किंवा व्हिडिओ कोणत्‍याही माध्‍यमातून कलेच्‍या बाबतीत सर्वकाही सांगते. हे संकेतस्‍थळ वेगवेगळया क्षेत्रातील कलावंत आणि त्‍यांच्‍या कलाकृत्‍यांवर प्रकाश टाकते. त्‍यामध्‍ये फॅशन, प्रॉडक्‍ट डिझाईन, ब्रँडिंग आणि वास्‍तुकलेचा समावेश आहे.

हे संकेतस्‍थळ 2009मध्‍ये सुरू झाले होते. सध्‍या त्‍याच्‍या वापरकर्त्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. डिझाईनच्‍या क्षेत्रात संदर्भसाठीही या संकेतस्‍थळाचा वापर केला जातो. तुम्‍ही प्रेरणा घेण्‍यासाठी काही शोधत असाल किंवा काही सुंदर व आकर्षक डिझाईन पाहिजे असतील तर हे संकेतस्‍थळ तुमच्‍यासाठी उपयुक्‍त आहे. तुम्‍हाला डिझाईन आवडत असेल किंवा स्‍वत: डिझायनर आहात तर हे संकेतस्‍थळ बुकमार्क करणे तुमच्‍यासाठी योग्‍य राहील. तसेच व्‍हाईटझाईन बातमीपत्रासाठी साईन-अप करू शकता, तर याद्वारे प्रेरणा घ्‍या, डिझाईन करा आणि ती शेअर करा.