आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: निसर्गाची आवड असणा-यांसाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.allaboutbirds.org: निसर्गाची आवड असणार्‍या आणि पक्ष्याविषयी विशेष रुची असणार्‍यांसाठी हे संकेतस्थळ एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. ऑल अबाउट बर्ड या संकेतस्थळावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांची सविस्तर माहिती फोटो आणि व्हिडिओसह उपलब्ध आहे. पक्ष्यांच्या विषयी सखोल माहिती घेण्यासाठी, त्यांना जवळून निरीक्षण करणे किंवा आवाज ऐकायचे असल्यास ही साइट अत्यंत उपयोगी आहे.

प्रत्येक पक्ष्याचे राहणीमान, त्याच्या सवयी इत्यादी गोष्टींचा उलगडा करणारे व्हिडिओ या साइटवर उपलब्ध आहेत. साइटचा वापर करणे एकदम सोपे आहे. बर्ड गाइड ऑप्शनमध्ये जावून पक्ष्याचे नाव किंवा त्यांच्या आकाराच्या आधारावर तुम्ही सर्च करू शकता. बर्डिंग बेसिक पर्यायावर जावून तुम्ही पक्ष्यांची प्राथमिक माहिती घेऊ शकता. याशिवाय बर्ड ऑफ वीक आणि साउंड ऑफ वीकसारखे आकर्षक फीचर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत