आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: अस्‍सल खवय्यांसाठी पर्वणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.punchfork.com: अस्सल खवय्ये असणार्‍यांसाठी पंचफोर्क ही वेबसाइट एक पर्वणी ठरते. या साइटच्या मदतीने जगभरातील विविध व्यंजनांची माहिती मिळते. येथे सिम्पल रेसीपीज, पायोनिअर वुमन, लेट्स कुनारिया, बेन एपीटिट, 101 कुकबुक्स अशा विविध साइटवरील माहिती या एकाच साइटवर पाहावयास मिळते.

या साइटचे संचालक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी चर्चा करतात. एखाद्या रेसिपीविषयी विचारविर्मश सुद्धा करतात. आपल्या आवडीनुसार आपण खाद्यपदार्थांचा रेसेपीज निवडू शकतो. शाकाहारी, मांसाहारी, इटालियन, काँटीनेटल अशा प्रकारच्या वैविध्यपूण रेसीपीजची माहिती या साइटच्या मदतीने घेता येते. या साइटशी जुडल्यानंतर आपल्या आवडी आणि रुचीनुसार विविध रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतात. साइटचा आस्वाद घेण्यास तुम्हाला साइटवर स्वत:चे अकाउंट सुरू करावे लागते.