आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITES: आरोग्‍याशी निगडीत माहिती घेण्‍यासाठी उपयुक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.health.yahoo.net: निरोगी राहण्यासाठी प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा त्यांची भेट घेणे शक्य नसते. काही सर्वसामान्य रोगांची माहिती आणि लक्षणे यांचे जुजबी ज्ञान तरी असले पाहिजे. इंटरनेटच्या मदतीने आरोग्याशी निगडित अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होते. आरोग्याशी निगडित माहिती देणारी हेल्थ डॉट याहू डॉट नेट ही एक उपयुक्त साइट आहे. येथे तुम्ही अँलर्जी, अस्थमा, डिप्रेशन, डायबेटिससारख्या आजारांची लक्षणे, कारणे, प्रकार, उपाय हे जाणून घेऊ शकता.

आपल्या नियमित जीवनशैलीविषयीदेखील माहिती घेऊ शकता. तुम्हाला अस्वस्थ वाढत असल्यास या साइटवर विविध रोगांची लक्षणं सांगितली आहेत. त्याआधारे तुम्हाला कशाचा त्रास होत आहे, हे जाणून घेऊ शकता. निरोगी राहण्यासाठी उपाये, सर्वसामान्य आजारातील खबरदारी याची सविस्तर माहिती या साइटवर उपलब्ध आहे.