आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: ग्राहकांचे योग्‍य बिल तयार करण्‍यासाठी अत्‍यंत महत्‍वाचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.invoiceto.me: वस्तू किंवा सेवांचे योग्य आणि नीटनेटके बिल तयार करणे प्रत्येकाला जमेल असे नाही. आकडेवारीची आवड नसणार्‍या व्यक्तींना बिल तयार करणे डोकेदुखी ठरते, अशावेळी इन्वाइस्टो डॉट मी ही साइट उपयुक्त ठरते. ही साइट किचकट कामाला सुलभ बनवते. साइटवर एक डमी बिल असते. तुम्ही यात स्वत:चे नाव टाइप करून ग्राहकाचे नाव लिहावे. त्यात ग्राहकाची सविस्तर माहिती आणि विक्री झालेल्या वस्तू, त्याचे प्रमाण आणि दर द्यावा लागतो.

एवढे भरल्यावर सर्व आकडेवारीची कॅल्क्युलेशन होते. यात करासंबंधित रकान्यातील आकडेवारीदेखील भरू शकता. फायनल एडिट झाल्यावर गेट पीडीएफवर क्लिक करून प्रिंट घेऊ शकता. तसेच फाइल सरळ ग्राहकाला पाठवू शकता.