आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: दैनंदिन जीवनातील गणितीय आकडेवारी सोडवण्‍यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.onlineconversion.com: दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक गणिती आकडेवारी करावी लागते. डॉलरचे रुपयांमध्ये रुपांतर, तापमानाचे फॅरेनहाइटमधून सेल्सियस, किंवा सेल्सियस ते फॅरेनहाइट असा बदल, किलोमीटरचे मीटर, फुटात मोजमाप करावे लागतात. अशा गणिती क्रिया करण्यासाठी बरेच डोके चालवावे लागते. अशावेळी ऑनलाइन कन्‍वहर्शन ही वेबसाइट उपयुक्त सिद्ध होते.

या साइटवर अंतर, ऊर्जा, चलन, नकाशे, दाब, वेग, तापमान, वजन अशा विविध प्रकारामधील कन्‍वहर्शन या साइटवर करता येतात. जगात प्रचलित असलेल्या सर्व मोजमापात एखाद्या प्रमाणाचे रुपांतर करण्याची सोय याठिकाणी आहे. ही साइट वापरण्यास सोपी आणि अतिशय सहज आहे. झटपट आकडेवारी करावयाची असल्यास ही वेबसाइट चांगला पर्याय ठरते. याठिकाणी दिलेल्या विंडोमध्ये संबंधित संख्या टाकून ती हव्या त्या प्रकारात रुपांतरित करता येते.