आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: म्‍युझिक लव्‍हर्ससाठी, त्‍यांच्‍या मूडप्रमाणे गाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.allmusic.com: संगीताची आवड असणार्‍या लोकांसाठी ही एक चांगली वेबसाइट आहे. वेबसाइटवर जगभरातील प्रसिद्ध संगीताविषयी माहिती दिलेली असते. वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताविषयीची माहिती अवघ्या काही सेकंदात मिळते. एखादे नवे गाणे किंवा अल्बम ऐकायचे असल्यास ते याठिकाणी लगेच उपलब्ध होते. थीम आणि मूडनुसार आवडीची इंग्रजी गाणी ऐकायची असल्यास या साइटला आवर्जून भेट द्या.

या साइटवर प्रसिद्ध संगीतकार आणि गायकांच्या मुलाखती वेळोवेळी टाकल्या जातात. तसेच अशा प्रसिद्ध व्यक्तींविषयी जाणून घ्यायचे असल्यास गुगलवर जाण्याची गरज नाही. तुम्हाला या साइटवर अशा व्यक्तींची सर्व माहिती मिळते. येथे नव्याने रिलीज झालेल्या तसेच जुन्या अल्बमची समीक्षा करून त्यांना रेटिंग दिलेले असते. ज्याचा मदतीने तुम्ही चांगल्या म्युझिकचा पर्याय निवडू शकता. साइटवर तुम्ही संगीत ऐकून ते खरेदी सुद्धा करू शकता. स्टाफ चॉइस प्रकारात दररोज नवीन आणि निवडक श्रवणीय गाणी उपलब्ध होतात.