आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: नवशिके ते व्यावसायिक चित्रकार सर्वांनाच उपयुक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.drawcentral.com: आपल्यापैकी काहीजण उत्कृष्ट चित्रे रेखाटतात. पेन्सिल स्ट्रोकने आकर्षक आणि सुंदर व्यंगचित्रे चितारतात. जर तुम्हालादेखील अशा पद्धतीची कला आवडत असल्यास हे संकेतस्थळ नक्की पाहण्यायोग्य आहे. या साइटची विशेष कौशल्ये पाहून ही साइट तुमच्या बुकमार्कमध्ये नक्की सहभागी होईल. ही साइट अँडम वॉटकिन्स संचलित करतात. ते स्वत: प्रसिद्ध टॉट आर्टिस्ट आहेत.

नव्याने चित्रकला शिकत असलेल्यांना या साइटवर विविध टिप्स, ट्रिक्स दिल्या जातात. नवशिके ते व्यावसायिक चित्रकार सर्वांनाच उपयोगी ठरेल अशी ही साइट आहे. याच्या मदतीने तुम्ही ड्रॉइंग स्किल सुधारू शकता. तसेच चित्रकलेला नवा आयाम देऊ शकता. सोप्या सोप्या चित्रातून सुरुवात करत वॉटकिन्स कठीण चित्रकलेचे मार्गदर्शन करतात. पेन्सिल आर्ट शिकणार्‍यांसाठी या ठिकाणी कार्टून, व्यक्ती, प्राणी, निसर्ग असे विविध प्रकारचे काम पाहावयास मिळतात.