आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: नि:शुल्‍क अँटी व्‍हायरससाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

http://virusscan.jotti.org: संगणकावर काम करताना एखादी फाइल करप्ट झाल्यामुळे तुम्हीसुद्धा चिंताग्रस्त झाला असाल. मात्र, आता याची चिंता करण्याची गरज नाही. http://virusscan.jotti.org हे संकेतस्थळ तुम्हाला विविध अँटी व्हायरस प्रोग्रामच्या मदतीने तुमची फाइल स्कॅन करून त्यात व्हायरस आहे किंवा नाही, हे सांगेल. ही सेवा नि:शुल्क आहे. यासाठी तुम्हाला कुठेच लॉग इन करावे लागणार नाही.

या संकेतस्थळावर तुम्ही 25 एमबीपर्यंतची फाइल स्कॅन करू शकता. कितीही अँटी व्हायरस इंजिनचा वापर केला तरी कोणतेही सिक्युरिटी सोल्युशन 100 टक्के सुरक्षेची गॅरंटी देत नाही. या संकेतस्थळावर व्हायरस स्कॅन करण्यासाठी तुम्ही जी फाइल अपलोड करता तिला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर बनवणार्‍या कंपन्यांसोबत शेअर केले जाते. अशा प्रकारे फाइल स्कॅन करण्याची जास्तीत जास्त सुरक्षेची गॅरंटी दिली जाऊ शकते.