आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: आवडते संगीत ऑनलाईन ऐकण्‍यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.musicsmasher.net: ऑनलाइन संगीत ऐकण्याची आवड असलेल्या लोकांसाठी इंटरनेट जगतात शेकडो पर्याय आहेत, परंतु जे गाणे ऐकण्याची तुमची इच्छा असते ते गाणे इंटरनेटवर किंवा एखाद्या संकेतस्थळावर मिळत नाही. असे नेहमीच होते. अशा वेळी म्युझिक स्मॅशर हे संकेतस्थळ तुमची मदत करू शकेल. हे संकेतस्थळ तुम्हाला संगीताचे प्रमुख संकेतस्थळ एकत्र करून सर्चचा पर्याय उपलब्ध करून देते.

या संकेतस्थळांमध्ये आरडियो, स्पॉटिफाय, ग्रुवेशार्क, यू-ट्यूब, साउंड क्लाउड, एमओजी आणि बँडकँप यांचा समावेश आहे. तुम्ही तुमचे आवडते कोणतेही गाणे ऐकण्यासाठी म्युझिक स्मॅशर साइटवर जेव्हा जाल तेव्हा या सर्व संकेतस्थळातून निघालेले रिझल्ट मिळतील. त्यानंतर त्या गाण्यावर क्लिक केल्यास गाणे सुरू होईल. या संकेतस्थळाचा इंटरफेस खूपच सोपा आहे. गाणे ऐकण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावर साइन-अप करण्याची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे सर्च करण्यापूर्वी ‘यूएस कॅटलॉक ओन्ली’चा पर्याय डिसेबल करा. यामुळे तुम्हाला एकाच वेळी अनेक रिझल्ट मिळतील.