आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: ऑनलाईन खरेदी करण्‍यासाठी कलात्‍मक पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.itokri.com: महत्त्वाची शॉपिंग करायची आहे पण पुरेसा वेळ नाही. अशावेळी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट उपयोगी ठरतात, पण भारतीय स्वरुपाच्या वस्तू,पारंपरिक ड्रेस, हस्तकला अशा वस्तू खरेदी करायची असल्यास ‘आयटोकरी’ डॉट कॉम एक चांगला पर्याय आहे. वेबसाइटचे होमपेज कलात्मक पद्धतीचे असून लक्ष वेधून घेते. याठिकाणी इंटरेस्टिंग,कल्पक,मन प्रसन्न करणारे प्रोडक्ट मिळतात.

होमपेजवर तुम्हाला कपडे, अँक्सेसरीज,बॅग्स, कला आणि चित्रपट,डिजिटल डिझाइन्स सारखे पर्याय असून यामधून तुम्ही तुमच्या आवडीचे साहित्य खरेदी करू शकता. वेबसाइटची कल्पकता वस्तूंना दिलेल्या नाव आणि विवरणावरुन दिसून येते. बहुतांश वस्तूंचे वर्णन कवितेच्या स्वरूपात आहेत. कपड्यांमध्ये तू तू मैं मैं, मिरचीवाली, खोटे सिक्केसारखे नावाचे पर्याय आहेत.