आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: वेबसाईटवरील माहिती प्रिंट करण्‍यासाठी उपयुक्‍त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.printwhatyoulike.com: अनेकवेळा आपण विविध वेबसाइटवरील माहिती प्रिंट करतो. यात प्रिंटिंग योग्य माहिती योग्य प्रकारात नसते. अशावेळी प्रिंट व्हाट यू लाइक डॉटकॉम उपयुक्त ठरते. आपल्याला वेबसाइटवरील एखादी माहिती प्रिंट करायची असल्यास त्या वेबसाइटचा यूआरएल कॉपी करून या साइटवर दिलेल्या ठिकाणी पेस्ट करावा. यानंतर या ठिकाणी संबंधित वेबसाइटचा माहिती प्रिंटिंग स्टाइलमध्ये उपलब्ध होते. याचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे तुम्हाला फक्त छपाईयुक्त माहिती दिसते.

जाहिराती आणि इतर अवांतर सामग्री या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे प्रिंट काढताना कागदाची बचत होते. त्याचप्रमाणे आपल्याला जेवढा भाग प्रिंट करायचा आहे. तेवढाच भाग निवडून प्रिंट करता येतो. जाहिरात वगळून उपयुक्त माहिती प्रिंट करण्याची गरज ओळखून जोनाथन कुमीजेन आणि कॅसी श्मिटज नावाच्या वेब डेव्हलपरनी ही साइट तयार केली आहे.