आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: प्रवास वर्णन वाचण्‍याची आवड असणा-यांसाठी मेजवानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.wanderinearl.com: डेरेक अर्ल बॅरोनला लोक वंडरिंग अर्ल नावाने ओळखतात. जगभरातील अनेक ठिकाणांची यात्रा करून एक भटकंतीप्रेमी म्हणून स्वत:ची ओळख तयार केली आहे. 1999 मध्ये थायलंड येथून अर्लच्या पहिल्या प्रवासाची सुरुवात झाली. प्रवासात त्यांना आनंद वाटल्याने त्यांनी सुट्या वाढवून घेतल्या आणि सुरू झाला एक अनोखा प्रवास. गेल्या 13 वर्षांत अर्ल यांनी जवळपास 70 देशांचा प्रवास केला आहे.

या प्रवासाच्या काळात त्यांनी टूर मॅनेजरचे काम केले. मेडिटेशनचे काम केले. त्याचप्रमाणे गिर्यारोहणापासून ते चित्रपटात अभिनय करण्याचा आनंद घेतला. एकदा तर त्यांचे दोन दिवसासाठी अपहरण झाले होते. या प्रवासात आणि पर्यटनात त्यांना आलेले अनुभव ब्लॉगवर टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्ल याचे अविस्मरणीय अनुभव वांडरिंग अर्ल डॉट कॉमवर उपलब्ध आहेत. प्रवास वर्णन वाचण्याची आवड असणार्‍यांसाठी ही वेबसाइट अनोखी मेजवानी ठरेल.