आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: अपॉइंटमेंट आणि कार्यक्रमाच्‍या आठवणीसाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.followupthen.com: एखादी अपॉइंटमेंट किंवा कार्यक्रमाची आठवण ठेवण्यासाठी तुम्ही ई-मेलची मदत घेता काय? जर अशी मदत घेत असाल तर तुमच्यासाठी फॉलोअप वेबसाइट मदतीची साइट ठरेल. ही साइट तुम्हाला योग्यवेळी रिमाइंडर देईल. या साइटवर एकदा साइनअप केल्यानंतर पुन्हा साइटवर जाण्याची गरज भासत नाही. किती वेळ आधी तुम्हाला रिमाइंड करायचे हे एकदा सेट झाल्यावर त्या वेळी त्यासंदर्भात आठवण करून दिली जाते.

आपल्याला कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा रिमाइंडर हवा हे देखील साइटवर नोंद करता येते. या साइटवर साइन अप मोफत असून रिमाइंडरसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. व्यग्र वेळापत्रक असणार्‍यांसाठी ही साइट अत्यंत उपयोगी आणि वेळ वाचवणारी ठरते.