आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: कामाच्‍या ठिकाणी थकवा घालवण्‍यासाठी सुरेख अनुभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.wavesilk.com: कामाच्या ठिकाणी काम करता करता थकवा आल्यास वेवसिल्क साइटवर जाऊन काहीवेळ सर्फिंग केल्यास नक्की आराम मिळेल. साइटचा सुरेख आणि रमणीय अंदाज तुम्हाला उत्साहित करेल. साइटचा वापर करणे एकदम शक्य आहे. वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन क्लिक अँड ड्रॅग पर्याय निवडा आणि माऊसच्या मदतीने आपली आवडती स्क्रीन तयार करा.

या साइटवर स्वत:ची कल्पकता दाखवण्याची चांगली संधी आहे. क्लिक आणि ड्रॅग केल्यानंतर विविध रंगातील मखमली लहरी स्क्रीनवर दिसतील. याला तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता. या लहरीचा वेग तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. कामाचा थकवा घालवण्यासाठी या स्क्रीनकडे काहीवेळ पाहत राहिल्यास तुम्हाला निश्चित आराम मिळेल.