आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: स्‍वत:च्‍या आवाजात मेसेज पाठवण्‍यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.croak.it: रंजक अंदाजात मेसेज पाठवण्याची आवड असलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त संकेतस्थळ आहे. ट्विटरवर ट्विट किंवा फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून मेसेज पाठवण्याऐवजी तुम्ही स्वत:च्या आवाजात संदेश पाठवण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करू शकता. या साइटवर व्हॉइस शेअरिंग सोल्युशन उपलब्ध आहे. त्यावर जाऊन तुम्ही ‘पुश टू क्रोक’ बटण दाबल्यावर हिरव्या रंगाचे बटण लाल होते. बटण लाल होण्याचा अर्थ रेकॉर्डिंग सुरू झाली आहे. आता तुम्ही तुमचा संदेश मायक्रोफोनच्या माध्यमातून बोलून रेकॉर्ड करू शकता.

तथापि, हा संदेश 30 सेकंदांपेक्षा जास्त नसला पाहिजे. रेकॉर्डिंग संपताच तुम्ही तो फेसबुक किंवा ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर, तसेच ई-मेल आणि ब्लॉगवर सहजपणे शेअर करू शकता. तुम्ही टेक्स्ट मेसेजला कंटाळला असाल आणि काहीतरी नवीन करायचे असेल तर या संकेतस्थळाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अत्यंत खासगी संदेश आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचवता येईल.