आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: आठवणीचे फोटो संग्रहित करण्‍यासाठी उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मम्मी-पप्पाच्या कडेवरील आपल्या लहानपणची छायाचित्रे असो किंवा मम्मी-पप्पाच्या लग्नाची असो, ही सर्व छायाचित्रे आपल्या सर्वांसाठी आठवणींचा खजिना असतो. जुन्या काही छायाचित्रांमध्ये वडिलांचे केस लांब असतात, तर काहींमध्ये 70 च्या दशकातील प्रिंटिंग शर्ट घातलेला असतो. अशा अनेक आठवणी छायाचित्रांद्वारे साठवून ठेवता येतात.

मात्र, आपण जेव्हा ती अल्बममध्ये ठेवतो तेव्हा काही वर्षांनंतर ती खराब होतात आणि त्यांचा रंगही फिका पडतो. या सर्व आठवणी संग्रहित करण्यासाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा सोनेरी भूतकाळ दुसर्‍यांना शेअरही करू शकता. संकेतस्थळावर वाढदिवस, पदवी, लग्न, कुटुंब, आजी-आजोबा, सुट्या यासारख्या श्रेणी उपलब्ध आहेत.