आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: इंटरनेट स्‍पीड टेस्टिंगसाठी सर्वोत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.speedtest.net: इंटरनेट वापरकर्त्यांसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने जेवढय़ा स्पीडसाठी तुम्ही पैसे मोजत आहात तेवढी स्पीड तुम्हाला मिळत आहे का? हे तुम्हाला तपासता येईल. या संकेतस्थळाच्या सेवा मोफत आहेत. तसेच जगातील विविध भागातही तुम्हाला या सेवांना लाभ मिळेल. ही सेवा वेब, आयफोन आणि अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

अशा प्रकारे हे संकेतस्थळ इंटरनेट स्पीडवर नजर ठेवण्यासाठी एक उत्तम शस्त्र आहे. प्रत्येक महिन्याला जगातील सुमारे पाच कोटी लोक संकेतस्थळाच्या सेवेचा लाभ घेतात. अशा प्रकारे इंटरनेट कनेक्शन टेस्टिंगच्या बाबतीत ही जगातील अग्रगण्य सेवा आहे. संकेतस्थळावर स्पीड तपासणे खूप सोपे आहे, परंतु जर तुम्ही तुमचा लॉग-इन तयार केला तर तुम्हाला एक टोपण नाव मिळेल. याद्वारे तुम्हाला या संकेतस्थळावर ओळखले जाईल. येथे तुम्ही आपले परिणाम दुसर्‍यांसोबतही शेअर करू शकता.