आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: कोणत्याही नेटवर्कवरील मित्रांशी गप्पा मारण्यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

imo.in: नवे मित्र मिळवण्यासाठी किंवा मित्रांशी गप्पा मारण्यासाठी हे एक उपयुक्त संकेतस्थळ आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला आयएमच्या कोणत्याही नेटवर्कवर मित्रांशी गप्पा मारण्यासह नवे मित्र तयार करण्यासाठीसुद्धा आयएमओ नेटवर्क जॉइन करता येईल. सध्या एमएसएन, स्काइप, याहू मेसेंजर, गुगल टॉक, फेसबुक, एआयएम/आयसीक्यू, जॉबर, मायस्पेस, हाइव्स आणि स्टीम आयएमओच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट आहेत. तुम्हाला गप्पा मारण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल किंवा डाउनलोड करण्याची गरज नाही.

हे संकेतस्थळ आयओएस आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार्‍या उपकरणांसाठीही उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही याद्वारे व्हीओआयपी म्हणजे वायस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलदेखील करू शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला थेट किंवा फेसबुक किंवा स्काइप किंवा इतर संकेतस्थळांना लॉग-इन आणि पासवर्डद्वारे लॉग-इन करता येईल. या संकेतस्थळावर लॉग-इन केल्यानंतर तुम्हाला ज्या नेटवर्कशी चॅट करायचे आहे ते नेटवर्क याच्याशी जोडावे लागेल.