आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Website For Toilet Break Reminder When You See Movie

AMAZING WEBSITE: चित्रपटावेळी टॉयलेट ब्रेकची आठवण करून देणारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.runpee.com: हे वाचून तुम्हाला थोडेसे हास्यास्पद वाटेल. पण अशी देखील एक वेबसाइट आहे जी सिनेमागृहात चित्रपट पाहत असताना लघुशंकेला कधी जावे हे सांगते. रनपी डॉटकॉम असे या आगळ्यावेगळ्या वेबसाइटचे नाव आहे. या सुविधेचा फायदा सध्या तरी फक्त हॉलीवूड चित्रपटापुरता र्मयादित आहे.

वेबसाइटवर अँड्राइड आणि आयओएस प्रणालीच्या मोबाइलसाठी सुद्धा अँप आहे. हे अँप्लिकेशन स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करा आणि तुम्ही जो चित्रपट पाहण्यासाठी गेला आहात तो निवडावा. चित्रपट सुरू झाल्यानंतर टायमर सुरू करा. या चित्रपटात टॉयलेट ब्रेक ज्यावेळी असेल त्याच्या काही वेळापूर्वी फोन व्हायब्रेट होतो. यामुळे तुम्हाला मध्यंतराची आगाऊ सूचना मिळते. काहीशी वेगळी अशी ही वेबसाइट आहे.