आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: ट्रॅव्‍हल प्‍लॅन तयार करण्‍यासाठी अत्‍यंत उपयोगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.kayak.co.in : ऑनलाइन ट्रॅव्हलला चांगले करणे या उद्देशाने ही साइट तयार करण्यात आली आहे. एक्सपीडिया,ट्रॅव्हलसिटी आणि ऑर्विट्जच्या संस्थापकांनी 2004 मध्ये कायकची सुरुवात केली. येथे तुम्ही शेकडो ट्रॅव्हल साइटची तुलना करू शकता. एअरलाइन, हॉटेलचे बुकिंग करण्यासाठी साइटवर तासन्तास बसावे लागते. पण कमी वेळात उत्तम ट्रॅव्हल प्लॅन तयार करण्यासाठी ही साइट चांगला पर्याय आहे.

एअरलाइन, हॉटेल, कार आणि ऑनलाइन ट्रॅव्हल साइट सगळे एकाच ठिकाणी उपलब्ध होते. आपल्याला काय हवे हे एकदा निश्चित झाल्यावर या साइटच्या मदतीने त्या सर्व गोष्टींची माहिती घेता येते. एखादी गोष्ट हवी असल्यास आपल्याला ही वेबसाइट संबंधित साइटवर घेऊन जाते. देश-परदेशात पर्यटनाची तयारी करत असाल तर या साइटवर एकवेळ निश्चित भेट द्यावी.