आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: कॉम्‍प्‍युटरवर मराठी टाईप करायचे आहे, चिंता नको !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www. quillpad.in : एखाद्या भारतीय भाषेत लिहून त्याचा अनुवाद होऊन देवनागरी लिपीत आल्यास किती बरे होईल, असा विचार तुम्ही करत असाल तर हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. क्विलपॅड एक ऑनलाइन टायपिंग टूल आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला 10 भारतीय भाषांमध्ये संवाद करता येईल. या भाषांमध्ये हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगू, कानडी, मल्याळम, मराठी, पंजाबी, बंगाली आणि नेपाळी भाषेचा समावेश आहे.

या भाषांचे ऑनलाइन एडिटर अनुवादासाठी तुमची मदत करतील. उदाहरणार्थ एखाद्या भाषेत ‘तुम्ही कसे आहात’ असे लिहायचे असेल तर तुम्हाला त्या भाषेवर क्लिक करून रायटिंग स्पेसमध्ये यावे लागेल. येथे तुम्हाला हिंग्लिशमध्ये मेसेज टाइप करावा लागेल, tumhi kase aahat तुम्ही हे टाइप करताच तुम्हाला ज्या भाषेत लिहायचे होते ती ट्रांसक्रिप्ट होऊन समोर येईल. हे शिकण्यासाठी यामध्ये डेमो ऑप्शनही आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला आपला मेसेज सोशल नेटवर्किंग साइट्सवरही पाठवता येईल.