आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: स्‍वत:ची फोटो गॅलरी तयार करण्‍यासाठी उपयुक्‍त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.dropevent.com: एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात अनेक जण फोटो काढत असतात. प्रत्येकाचे फोटो हे आपआपल्या अल्बममध्ये किंवा अकाउंटवर अपलोड केले जातात, पण सर्वांचे फोटो एकत्र पाहता येत नाही. कार्यक्रमातील सर्व फोटो एकत्र पाहायचे असल्यास डॉपइवेंट ही वेबसाइट उपयुक्त ठरते.या वेबसाइटवर तुम्ही स्वत:ची फोटो गॅलरी तयार करू शकता. या गॅलरीत कोणतेही साइन केल्याशिवाय फोटो टाकता येतात.

सहा महिन्यांसाठी मोफतपणे ही साइट वापरता येते. अकाउंट उघडणारा व्यक्ती आपल्या गॅलरीत कोण कोण फोटो टाकू शकतो हे ठरवतो. त्याने ठरवलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणीही फोटो टाकू शकत नाही. साइटची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे याठिकाणी तुम्ही कितीही फोटो अपलोड करू शकता.त्यासाठी कोणतीही र्मयादा नाही.साइट वापरणारे लोक येथील फोटो मोठय़ा साइजमध्ये डाउनलोड करू शकतात.