आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bharat Petrolium News In Marathi, Oil Exploration, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत पेट्रोलियम राबवणार ४५ हजार कोटींची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने रिफायनिंग, विपणन आणि तेल संशोधन क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी पुढील चार वर्षांत ४५ हजार कोटी रुपयांची भांडवली खर्च योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या भांडवली खर्च योजनेबरोबरच नुमालीगड रिफायनरीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करून ती तीन दशलक्ष मेट्रिक टनांवरून वर्षाला नऊ दशलक्ष टनांवर नेण्याच्या शक्यतेचा अभ्यास सध्या चालू आहे.

या प्रकल्पामध्ये पूर्व किना-यापासून ते आसामपर्यंत कच्चे तेल वाहून नेण्यासाठी पापलाइन टाकण्याचा विचार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. वरदराजन यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकार परिषेत माहिती देताना सांगितले.शुद्ध इंधन अधिक प्रमाणात उत्पादन करण्यासाठी कंपनी आपल्या देशातील विद्यमान तसेच मोझांबिक, ब्राझील व इंडोनेशियातील प्रकल्पांचाही विस्तार करणार आहे. त्या दृष्टीनेदेखील गुंतवणूक योजना आखली आहे. मोझांबिक आणि ब्राझील प्रकल्पांसाठी १२ हजार कोटी रुपये
खर्च करण्यात येणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्षमता विस्तारावरील खर्च : कोची रिफायनरी - १६,५०० कोटी रु., बीना रिफायनरी - २,९०० कोटी रु.

ओएनजीसीची ८१ हजार कोटी गुंतवणूक
प्रमुख तेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादनाची ठिकाणे जुनी होत आहेत आणि त्यांची नैसर्गिक झीज होत आहे. ही झीज रोखणे तसेच तेथील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी. तेल आणि नैसगिर्क वायू उत्पादनात आघाडीवर असलेल्या या कंपनीने ८१,८९० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.