आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhopal City Is Going Digital City, Wi Fi Connection

भोपाळ बनेल डिजिटल सिटी; संपूर्ण शहर होईल \'वाय-फाय\'ने कनेक्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ-भविष्यात मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ शहर डिजिटल सिटी म्हणून ओळखले जाणार आहे. संपूर्ण भोपाळ शहर 'वाय-फाय'ने कनेक्ट होणार आहे. यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीएसएनएलने तयारी सुरू केली आहे. येत्या चार महिन्यांत भोपाळमधील रहिवाशांना 'वाय-फाय' सुविधा देण्याचा दावा दूरसंचार सेवा देणार्‍या दोन्ही कंपन्यांनी केला आहे. यासाठी रिलायन्सने संपूर्ण शहरात ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरवले आहे. तसेच बीएसएनएलकडूनही शहरातील महत्त्वाच्या परिसराची पाहाणी केली आहे. या भागात वाय-फाय सुविधा दिली जाणार आहे.
भोपाळ शहराचा डिजिटल सिटीच्या रुपात विकसित करणार असल्याचे रिलायन्सच्या सुत्रांनी सांगितले आहे. यासाठी शहरात 300 किमी आणि 450 किमी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आल्या आहेत. रिलायन्सने या माध्यमातून 4जी सेवाही देण्याची तयारी केली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सविस्तर वृत्त...