आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठा प्रश्न - स्वत:साठी कोणती कार निवडावी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणती कार खरेदी करायची अशी विचारणा करणारे अनेक मेल मला येतात. मात्र, या आठवड्यात मला आतापर्यंतचे सर्वात अवघड असे काम मिळाले. मला माझ्या छोट्या भावासाठी कार शोधावी लागली. त्यानेही माझ्याप्रमाणेच विदेशात राहून काम केलेले आहे. त्याला जगभरातील सर्व कार आणि त्यांच्या किमतीविषयी माहिती आहे. तोही माझ्याप्रमाणेच कारचा शौकीन आहे. रोजच्या वापरासाठी चांगला अनुभव देणारी कार त्याला हवी आहे.
कार निवडायची कशी ते आता आपण माहिती करून घेऊ. सर्वप्रथम ऑन रोड किमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असावी. रात्रीचा प्रवास आरामात होण्यासाठी त्यात पुरेशी जागा असावी. कारचा ब्रँड विश्वासार्ह असावा, ज्याचे सर्व्हिस नेटवर्क चांगले असावे.


याच आधारावर मी माझ्या भावासाठी कार शोधल्या. मात्र, मला भारतीय कार बाजारात एक मोठी उणीव जाणवली. चांगल्या कारसाठी 15 लाख रुपयांहून जास्त खर्च करणे भाग आहे. जी एका 26 वर्षीय व्यावसायिकासाठी मोठी रक्कम आहे.


कालानुरूप कार आता अधिक स्पोर्टी लूक धारण करताहेत. त्यावर अनेक ठिकाणी स्टीकर लावलेले असतात. एकाच कारवर एकपेक्षा जास्त रंगाचा वापर, अलॉय व्हीलसारख्या आकर्षक अ‍ॅसेसरीज आणि हाय प्राइस टॅगही. असे असले तरी गेल्या काही वर्षात अनेक चांगल्या कारही बाजारात आल्या आहेत. यात मारुती स्विफ्टसारख्या कारचा समावेश आहे, त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात जास्त जागा आहे. याचे सुलभरीत्या वळणारे स्टेअरिंग कारला अधिक उत्तम बनवते. गर्दीच्या रस्त्यावर ही कार चालवणे तुलनेत सुलभ जाते. मात्र, मारुतीने स्विफ्टला अनुरूप असे इंजिन आणि सस्पेंशन दिलेले नाही. यामुळे काही वेळ धावल्यानंतर खकुल्या रस्त्यावर ही कार मागे पडते.


फोर्ड फिएस्टा 1.6 एस हीदेखील एक चांगली कार आहे. स्विफ्टच्या तुलनेत याचे सस्पेन्शन जास्त चांगले आहे. इंजिनही उत्तम आहे. जास्त घरघर झाली तरी इंजिन थकत नाही. शहरातील वाहतूक असो
वा वळणदार हायवे त्यावर चालवण्यासाठी ही उत्तम कार आहे. मात्र, फोर्ड अद्याप फिएस्टा 1.6 चे उत्तराधिकारी मॉडेल सादर केलेले नाही. याचाच अर्थ या कारमुळेही माझा शोध थांबला नाही.


शेवटचा पर्याय म्हणून फोक्सवॅगनची पोलो कार माझ्यासमोर आली. पोलो कार स्विफ्ट आणि फिएस्टा 1.6 च्या तुलनेत उत्तम आहे. या कारला पोलो जीटी टीएसआय या नावाने ओळखले जाते. यात 105 एचपी टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिनसह 7 स्पीड ड्युएल गिअर बॉक्स देण्यात आला आहे. पोलोची मजबूत चेसी ही कार चालवण्याचा आनंद देते. सस्पेन्शन सेटअप आणि टायर पोलोला कमकुवत बनवतात.


एवढा शोध घेऊनही माझा शोध अपूर्ण राहिला. भारतात असलेल्या सर्व कार कंपन्यांनी आपल्या वैश्विक श्रेणीतील कार येथील बाजारात उतरवलेल्या नाहीत. फोर्डकडे फिएस्टा एसटी, फोक्सवॅगनकडे पोलो जीटीआय आणि रेनॉकडे रेनॉस्पोर्ट अशा श्रेणी आहेत. मात्र, या कार भारतीय बाजारात उतरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला श्रेणीतील सर्वोत्तम कारची निवड करावी लागणार आहे. एका उत्तम पेट्रोल कारसाठी
त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.