आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Big Smartphones| Top Smartphones With Large Screen Size

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOP 7: हे आहेत पाच इंचापेक्षा मोठी स्क्रीन असलेले भारतातील स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - स्मार्टफोन्सचा डिस्प्ले सध्या दररोजच वाढत चालला आहे. पुर्वी जेथे 2 अथवा 3 इंचाची स्क्रीन साईज असणारे स्मार्टफोन्स येत होते, त्याचा साईज वाढून आता 6 इंचापर्यंत पोहोचला आहे. भारतीय बाजारपेठेत आता मोठ्या स्क्रीनच्या स्मार्टफोन्सची चलती आहे. आज आम्ही तुम्लाहा सांगणार आहोत 5 इंचापेक्षा जास्त मोठी स्क्रीन असलेल्या मोबाईल्सबद्दल...

Motorola Moto X (2nd Generation):
किंमत- 29999 रुपये
स्क्रीन साइज- 5.2 इंच

मोटोरोलाच्या या नव्या मॉडेलला 5.2 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय या फोनमध्ये फुल एचडी (1080X1920 पिक्सलचे रेजोल्यूशन) क्वालिटी देण्यात आली आहे. मागे आलेला स्मार्टफोन मोटो X मध्ये 4.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली होती. या मोठ्या स्क्रीनसोबत हा फोन स्टायलिश वुड बॅक आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
423 पिक्सल प्रति इंच डेन्सिटीमुळे युजर्सला चांगला व्यूव्हींग अँगल मिळतो. ज्यामुळे जास्त उन्हातही स्क्रीन ब्लॅक दिसत नाही. आणि कोणत्याही कोपऱ्यातून पाहिल्यास फोन माहिती दिसते. हा फोन मल्टी टच सपोर्ट देतो. मोटो डिस्प्ले, मोटो असिस्ट, वॉईस कमांड यांसारख्या फीचर्समुळे मोटो X (2) हा एक चांगला पॉवरफूल स्मार्टफोन ठरतो. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 Soc प्रोसेसर लावण्यात आले आहे. हे क्वाड-कोर प्रोसेसरपेक्षा खुपच पॉवरफुल आहे. या फोनमध्ये देण्यात आलेली 2 GB रॅम गेमिंग आणि मल्टीटास्कीन शौकीनांना नक्कीच आवडू शकते.
मोटो X (2) मध्ये जो प्रोसेसर लावण्यात आला आहे, तोच प्रोसेसर सॅमसंग गॅलक्सी S5, एक्सपीरिया Z2, HTC M8 यांसारख्या हाय बजेट स्मार्टफोन्समध्ये लावण्यात आले आहे. 16 GB आणि 32 GB अशा दोन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची एक कमी म्हणजे यामध्ये कार्डस्लॉट देण्यात आलेले नाही.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर ६ मोठी स्क्रीन असणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल...