आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Gates Faced Problem While Working On Windows

विंडोज 8.1 इन्स्टॉल करण्‍यात बिल गेट्स यांच्यासह नवे सीईओ ठरले अपयशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानात संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारी सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मंगळवारी नियुक्ती झाली. दुसरीकडे मायक्रोसॉफ्टचे को- फाउंडर बिल गेट्स यांनीही टेकनॉलॉजी अॅडव्हाहझर म्हणून मंगळवारपासून काम सुरु केले. मात्र कामाच्या पहिल्या दिवशीच त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले.

बिल गेट्‍स यांनीही मात्र आपल्या नव्या कॉम्प्यूटरमध्ये विंडोज 8.1 इन्स्टॉल करण्यात अनेक अडचणी येत होत्या. नंतर त्यांनी म्हणून नवनिर्वाचित सीईओ सत्या नाडेला यांना बोलावून घेतले. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाडेला हे देखील विंडोज 8.1 इन्स्टॉल करण्यात अपयशी ठरले.

'The New Yorker' ने दिलेल्या अहवालानुसार, विंडोज 8.1 इन्स्टॉल करण्‍यात बिल गेट्स आणि सत्या नाडेला यांनी दिवसभर परिश्रम घेतले. परंतु त्यांच्या परिश्रमाला फळ मिळाले नाही. लंच टाईमनंतर गेट्‍स यांच्या कॉम्प्यूटरमध्ये अडचण निर्माण झाली. गेट्स यांनी ती सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती काही केल्या सूटत नव्हती. अखेर त्यांना नवे सीईओ सत्या नाडेला यांची मदत घेतली. मात्र, त्यांनाही विंडोज 8.1 इन्स्टॉल करता आली नाही. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कोणती होती समस्या आणि बिल गेट्स यांच्याबाबत रोचक किस्से...