आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेले मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या पुनरगमनाच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. बिल गेट्स पुन्हा एकदा 'मायक्रोसॉफ्ट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सध्या या पदावर कार्यरत असलेले स्टीव्ह बाल्मर हे काही महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत.
मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदासाठी बिल गेट्स हेच प्रमुख दावेदार आहेत, असे नाही. या पदासाठी जगातील अनेक दिग्गज उत्सूक आहेत. परंतु सध्या बिल गेट्स यांच्याच नावाची बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे.
बिल गेट्स यांनी सन 1980च्या दशकात मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर 90च्या दशकात विंडोज् लॉन्च करून 'मायक्रोसॉफ्ट' या ब्रॅंड्सला जगात मानाचे स्थान मिळवून दिले होते.
दरम्यान, बिल गेट्स यांनी 2008मध्ये कंपनीला 'रामराम' करून आपल्या फाउंडेशनचे काम पूर्ण वेळ पाहात होते. 'महादान' या अभियानातंर्गत त्यांने जगभरातील अनेक दिग्गजांचीही मदत घेतली होती. असे असतानाही बिल गेट्स यांच्या पुनरगमनाबाबत बाजारात रोचक चर्चा सुरु झाली आहे. बिल गेट्स यांचे पुनरागमन निश्चितच 'मायक्रोसॉफ्ट' कंपनीला फायदेशीर ठरणार आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, 'बिल गेट्स यांनी वयाच्या 13 वर्षीचकॉम्प्यूटर क्षेत्रात क्रांती घडवली होती'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.