आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Billionaire Mukesh Ambani Daughter Isha Joins Mckinsy As Consultant

1340 अब्जांचे मालक मुकेश अंबानींची मुलगी ईशा बाहेरच्या कंपनीत करणार नोकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील मातब्बर उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानींची मुलगी ईशा अमेरिकेची मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी मॅकेन्जीमध्ये नोकरी करणार आहे. तिने कन्सल्टंट म्हणून जॉइन केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ईशाला कामाचा अनुभव यावा आणि मुकेश यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तिने पाऊल ठेवल्यानंतर ते तेवढेच दमदार ठरावे या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक रिलायन्सला या संबंधी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळू शकलेले नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार 22 वर्षीय ईशा वडिलांच्या उद्योगात त्यांना सोबत करत आहे. कंपनीच्या पर्यावरणाबाबतच्या प्रकरणांकडे ती बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे बोलले जाते. फोर्ब्स वेबसाइटच्या आकडेवारीनुसार मुकेश अंबानींची 18 एप्रिल 2014 पर्यंतची संपत्ती 1339.77 कोटी रुपये आहे तर, मॅकन्जी 470 अब्ज रुपयांची कंपनी आहे.
येल मधून घेतली पदवी
ईशाने अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीमधून 2013 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षीक सर्वसाधारण बैठकीत ती वडिलांसोबत होती. पियानो वाजवण्यात तिला विशेष रुची आहे. फोर्ब्सने जगातील 16 वर्षांच्या अब्जाधीश युवा उत्तराधिका-यांची यादी प्रसिद्ध केली त्यात ईशा क्रमांक दोनवर होती. तेव्हापासून ती लाइमलाइटमध्ये आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय करतात ईशाचे बंधु