आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनधन : काळा पैसा लपवण्याचे माध्यम?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- देशातील प्रत्येक कुटुंबात किमान एक बँक खाते असावे या उद्देशाने पंतप्रधान जन धन योजना सादर करण्यात आली. त्यानुसार जन धन योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी विक्रमी प्रमाणात खाती उघडण्यात आली. मात्र जास्तीत जास्त खाती उघडण्याच्या शर्यतीत या योजनेच्या मूळ हेतूला धक्का बसला आहे. अनेकांनी काळा पैसा लपवण्यासाठी १० ते १२ खाती उघडली असल्याची माहिती आहे.

ज्या लोकांकडे अद्याप एकही बँक खाते नाही अशा लोकांना नो फ्रिल अकाउंट अथवा झीरो बॅलन्स खात्याद्वारे जोडणे हा यामागचा हेतू होता. मात्र बँकेच्या सूत्रांकडून िमळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांकडे पूर्वीपासून बँक खाते आहे अशा लोकांनीही जन धनअंतर्गत खाते उघडले आहे. एवढेच नव्हे तर ज्यांची पाच-सहा खाती आहेत अशांनीही यात खाते उघडले आहे. बँकांची अडचण अशी की एखाद्या व्यक्तीचे इतर बँकांत खाते आहे की नाही याची शहानिशा करण्याची यंत्रणा बँकांकडे नाही.

आर्थिक सर्वसमावेशकतेच्या या मोहिमेत ज्यांची खाती आहेत असे बरेच लोक जोडले गेले असून अपघात विम्यासह काळा पैसा लपवण्यासाठी जन धन योजनेत खाती उघडण्यात आली आहेत. जन धनअंतर्गत खात्यांवर बरेच िनर्बंध आहेत. वर्षात एक लाखापेक्षा जास्त व्यवहार करता येणार नाही.
पळवाटा बुजवण्याची गरज
>पॅन कार्डची अनिवार्यता टाळणे हा चांगला पर्याय असला तरी या घोटाळेबाजांनी नेमका याच बाबीचा दुरुपयोग केला. आता शुक्रवारपासून जन धन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. सरकारने या बाबींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून यात योग्य ती सुधारणा करणे गरजेचे आहे.
> पाटण्यात अनेक ठिकाणी खासगी शाळांच्या विद्यार्थी ओळखपत्रांवर खाती उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आर्थिक समावेशनाच्या सामाजिक हेतूने सुरू करण्यात आलेली ही योजना घोटाळेबाजांसाठी भेट ठरणार असून काळा पैसा लपवण्याचे उत्तम साधन ठरणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
एकापेक्षा जास्त खाती उघडण्याचे प्रकार
दीर्घकाळ बँक सेवेत असणाऱ्या व सध्या एजीएम पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की,शिबिरात येणारे २५ ते ३० टक्के लोक चांगल्या घरातील आहेत आणि बँकिंग सेवेबाबत चांगली माहिती असणारे आहेत. छोटे व्यावसायिकही यात मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, असे लोक वेगवेगळ्या बँकांच्या िशबिरात जाऊन १० ते १२ पेक्षा जास्त खाती उघडत आहेत.