आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blackberry ने लॉन्च केला \'Classic\', वाचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनचे फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Blackberry कंपनीने आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन 'Blackberry Classic' लॉन्च केला आहे. या फोनमध्ये QWERTY स्टाइल की-बोर्ड देण्यात आला आहे. टच डिव्हाइसेसच्या ट्रेंडमध्ये Blackberry Classic स्मार्टफोनमध्ये 'टच & टाइप' फीचर देण्यात आले आहे. 'कमबॅक' करण्यासाठी Blackberry ने जुने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. टच डिव्हाइसेसचा ट्रेंड असताना युजर्स या फोनला किती 'लाईक' करतात, हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Blackberry Classic ची किमत किती असेल याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. Blackberry Classic हा फोन प्री-ऑर्डरसाठी 449 डॉलर्समध्ये (जवळपास 28500 रुपये) कॅनडा आणि अमेरिकेत उपलब्ध करून दिला जात आहे.

वैशिष्ट्ये..
* टच & टाइप डिव्हाइस-

टच स्क्रीनसोबत युजर्सला फिजिकल कीबोर्डही देण्यात आले आहे.
* न्यू ऑपरेटिंग सिस्टम-
BB OS (ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टम) वर Blackberry classic फोन काम करतो. (व्हर्जन 10.3.1)
* 16 GB मेमरी-
Blackberry Classic स्मार्टफोनमध्ये 2GB रॅमसोबत 16 GBची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याशिवाय एसडी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत मेमरी वाढवता येते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Blackberry Classic मधील स्मार्ट फीचर्स...