आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्‍लॅकबेरी'चे निर्माते कंपनी विकण्‍यास तयार, 'रिसर्च इन मोशन'च्‍या नामांतरास मंजूरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओन्‍टॅरियो- स्‍मार्टफोनच्‍या स्‍पर्धेत माघारलेल्‍या 'ब्‍लॅकबेरी'ची निर्माती कंपनी 'रिसर्च इन मोशन'चे नामांतर होणार आहे. 'रिसर्च इन मोशन' या नावाचे 'ब्‍लॅकबेरी' असेच नामकरण करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ही कंपनी यापुढे 'ब्‍लॅकबेरी' या नावानेच ओळखली जाईल. यासाठी कंपनीच्‍या समभागधारकांनी मंजूरी दिली. समभागधारकांच्‍या बैठकीमध्‍ये नामांतराचा प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आला. याशिवाय 'BBRY' हा लोगोही बदलण्‍यात येणार आहे. नामांतरशिवाय मोठी आणि महत्त्वाची बाब म्‍हणजे संपूर्ण कंपनीचीच विक्री करण्‍याची व्‍यवस्‍थापनाची तयारी आहे. कंपनीचे सीईओ थॉर्स्‍टन हेन्‍स यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले, की समभागधारकांच्‍या भल्‍यासाठी अनेक पर्याय समोर आहेत. त्‍यापैकी एक पर्याय म्‍हणजे कंपनीची संपूर्ण विक्री.


सीईओ हेन्‍स यांनी सांगितले, की कंपनी स्थित्‍यंतरातून जात आहे. ही एक दिर्घकालीन प्रक्रीया आहे. त्‍यापैकी हा दुसरा टप्‍पा आहे. तिस-या टप्‍प्‍यात कंपनी नफ्यात येईल. समभागधारकांच्‍या हितासाठी कंपनी बांधील आहे. त्‍यांच्‍या हितासाठी कंपनी नवे करार करण्‍यासाठी तयार आहे. गरज पडल्‍यास संपूर्ण कंपनीही विकण्‍याची तयारी आहे.