आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BlackBerry Previews Big Loss, To Cut 4,500 Workers

ब्‍लॅकबेरीला मोठा तोटा, जगभरातून 4500 कर्मचारी कमी करण्‍याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी स्‍मार्टफोनच्‍या विश्‍वात आघाडीवर असलेल्‍या 'ब्‍लॅकबेरी'ची अधोगती झाली आहे. कंपनी प्रचंड तोट्यात असून 40 टक्‍के नोकरकपात करण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापनाने घेतला आहे. त्‍यानूसार जवळपास 4500 कर्मचा-यांना कमी करण्‍यात येणार आहे. कंपनीने दुस-या तिमाहीत 1 बिलियन डॉलर्स एवढा तोटा झाल्‍याची माहिती दिली आहे.

मूळची कॅनडातील 'रिसर्च इन मोशन' या कंपनीचे नुकतेच 'ब्‍लॅकबेरी' असे नामांतर झाले. कंपनीने 'ब्‍लॅकबेरी' या नावाखाली गेल्‍या दशकाच्‍या सुरुवातीला स्‍मार्टफोन्‍स बाजारात आणले होते. हे फोन्‍स अतिशय लोकप्रिय झाले. ब्‍लॅकबेरी फोन वापरणारा एक विशिष्‍ट असा चाहता वर्ग निर्माण झाला. मात्र, जाणकारांच्‍या मते ब्‍लॅकबेरी आता अखेरच्‍या घटका मोजत आहे. कंपनीला प्रचंड तोटा होत आहे. कंपनीने दिलेल्‍या माहितीनुसार, दुस-या तिमाहीत 1 बिलियन डॉलर्स एवढा तोटा झाला आहे. हा जवळपास 50 टक्‍के तोटा आहे.