Home | Business | Gadget | blackberry tablet playbook in indian market, business, gadget

ब्लॅकबेरी टॅब्लेट प्लेबूक महिन्याभरात भारतीय बाजारात

agency | Update - Jun 11, 2011, 03:16 PM IST

भारतासह १६ देशांतील बाजारपेठांमध्ये ब्लॅकबेरी टॅब्लेट प्लेबूक येत्या महिन्याभरात बाजारात येईल.

 • blackberry tablet playbook in indian market, business, gadget

  भारतासह १६ देशांतील बाजारपेठांमध्ये ब्लॅकबेरी टॅब्लेट प्लेबूक येत्या महिन्याभरात बाजारात आणले जाईल,'' असे रिसर्च इन मोशन (रिम) यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. यापूर्वी प्लेबूक अमेरिका व कॅनडा येथे कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत.

  या महिन्याभरात कंपनी भारतासह ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, हॉँगकॉँग, इटली, स्पेन, जर्मनी, हॉलंड, मेक्सिको, इंडोनिशीया, व्हेनेझुएला, कोलंबिया, सिंगापूर, सौदी अरेबिया आदी देशांचा यात समावेश आहे.
  ब्लॅकबेरी टॅब्लेट प्लेबूक हे जगातील पहिले व्यावसायिक प्रकारातील टॅब्लेट असून, यात अत्याधुनिक सिक्यूरिटी फीचर्स, वेब ब्राऊंजिगमधील अद्यायावत तंत्रज्ञान, ट्रू मल्टिटास्कींग, एचडी मल्टिटास्किंग यांच्यासह अनेक सुविधा यात उपलब्ध होणार आहेत.
  भारतात याची किंमत कंपनीने ठरविली नसली तरी तीन मॉडेल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याची किंमत अंदाजे ४९९ ते ६९९ डॉलरच्या घरात असतील, असे सांगण्यात येत आहे.
  या विस्तारीत बाजारपेठेमुळे ब्लॅकबेरी टॅब्लेट प्लेबूकची विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता बाजारपेठ तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Trending