आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ब्लॅकबेरी\'चे भविष्य \'ब्लॅक\'? मागणी घटल्याने हँडसेटची निर्मिती बंद होण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल दुनियेतील एकेकाळची 'दादा' कंपनी म्हणवणारी 'ब्लॅकबेरी' कंपनीचे भविष्य अंधारले आहे. 'ब्लॅकबेरी' मोबाईल हँडसेटची मागणी कमालीची घटली आहे. मात्र, अशीच परिस्थिती काही दिवस आणखी राहिल्यास हँडसेट निर्मिती बंद करण्‍याची वेळ येऊ शकते, असे खुद्द ब्लॅकबेरी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॉन चेन यांनी म्हटले आहे.

जॉन चेन म्हणाले, काही दिवसांपासून 'ब्लॅकबेरी'च्या हँडसेटची विक्री घटली आहे. परिणाम कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कंपनी जास्त काळ तोट्यात चालू शकत नाही. विशेष म्हणजे हॅंडसेट निर्मिती गुंडाळल्याचा निर्णय घेण्यास जास्त वेळ लागणार नसल्याचेही संकेत जॉन यांनी दिले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आणखी काय म्हणाले ब्लॅकबेरीचे सीर्इओ...