आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blood Pressure Now Check By New Digital Equipment

रक्तदाब तपासण्यासाठी नवे डिजिटल उपकरण बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पॅरामाउंट सर्जिमेड लिमिटेड या कंपनीने रक्तदाबाचे नियंत्रण करण्यासाठी डिजिटल उपकरण बाजारात आणले आहे. या डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर उपकरणाच्या मदतीने रक्तदाबाची अचूक माहिती मिळते. त्याचप्रमाणे हृदयाच्या ठोक्यांची माहिती देते तसेच ठोके अनियमित झाल्यास त्याबद्दल सतर्क करते. या उपकरणाला एलसीडी डिस्प्ले असून यावर ‘जागतिक आरोग्य संघटना’ (डब्ल्यूएचओ) निर्देशकदेखील आहे. चार हजार रुपये किंमत असलेले हे उपकरण टॉकिंग डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर, आर्म डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर आणि व्रिस्ट डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर अशा तीन प्रकारांत उपलब्ध आहे.